खुल्या बालचित्रकला स्पर्धेत ७७ हज़ार ४५३ विद्यार्थ्यांचा सहभाग
मुंबई दि.०८ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे रविवारी आयोजित केलेल्या बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत मुंबईतील
७७ हजार ४५३ विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबईत विविध ४५ ठिकाणी सकाळी ८ ते ११ या वेळेत ही स्पर्धा पार पडली.
सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण, रजत पदके मिळविली
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, १२ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल
स्पर्धेत ‘माझी मुंबई’ या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्रे काढली. स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा येत्या २१ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांसाठी ५०० ते २५ हजार रुपयांपर्यंतची ५५२ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली.