गुन्हे-वृत

खडकपाडा परिसरातून दोन टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

कल्याण दि.०९ :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भरारी पथकाने खडकपाडा परिसरात शनिवारी दोन टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले.‌
महापालिका घनकचरा विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, १२ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल

घनकचरा विभाग भरारी पथक, ब प्रभाग सहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांना कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातून प्लास्टिकच्या गोणी घेऊन एक टेम्पो जाणार असल्याची माहिती मिळाली होती. महापालिका उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात महापालिकेचे भरारी पथक तैनात ठेवण्यात आले होते.

मुंबई विमानतळावर ७५ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. एक टेम्पो खोके घेऊन जात असल्याचे तपासणी पथकाला दिसले. त्यांनी टेम्पोला अडवून त्याची तपासणी केली असता पुठ्ठ्यांखाली दडवून ठेवलेल्या ३५ गोण्या दिसून आल्या. गोण्यांची पाहणी केली असता त्यात प्लास्टिकचे गठ्ठे आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *