कोचर दाम्पत्याला जामीन
मुंबई दि.०९ :- ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. कोचर यांची अटक अवैध असल्याचे सांगून चंदा व त्यांचे पती दीपक कोचर यांची प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले.
भूखंडावरील खुल्या क्षेत्राच्या जागेपैकी ५ टक्के जागा मियावाकी वनांसाठी
आयसीआयसीआय बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी २३ डिसेंबरला कोचर दाम्पत्याला अटक केली होती. त्यानंतर व्हिडिओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. न्यायालयाने या तिघांना १० जानेवारीपर्यंत १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.
‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात अक्षय केळकर विजेता
सीबीआयने कारवाईपूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील (पीसीए) तरतुदींतर्गत कोणतीही मंजुरी घेतली नव्हती. त्यामुळे ही कारवाई अवैध असल्याचा दावा कोचर दाम्पत्याने आपल्या युक्तिवादात केला होता.