कोनगाव (भिवंडी) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वाचा हुंकार
कल्याण दि.०९ :- ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कल्याण आणि भिवंडीत हिंदूंच्या भूमीवर मोठ्या प्रमाणात अन्य पंथीयांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद तसेच गड किल्ले यांच्यावरील अतिक्रमण यांमुळे सर्वसामान्य हिंदू त्रस्त झाला आहे. हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी हाच एक पर्याय असून हिंदु राष्ट्राची मागणी एकमुखाने केली पाहिजे आणि यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद वडके यांनी केले.
भूखंडावरील खुल्या क्षेत्राच्या जागेपैकी ५ टक्के जागा मियावाकी वनांसाठी
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कल्याण पासून जवळच असलेल्या भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत संगीता जाधव यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, समाजातील विविध मान्यवर यांच्यासह धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.
‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात अक्षय केळकर विजेता
आपल्या देशात शासकीय अनुदानातून मदरसांमधून इस्लामचे शिक्षण, तर कॉन्व्हेंट शाळांमधून बायबल शिकवले जाते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांमधून हिंदु धर्म शिकवण्यासाठी सरकारी अनुदान नाही. ही संविधानातील असमानता दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे, असे धनश्री केळशीकर यांनी सांगितले.
खडकपाडा परिसरातून दोन टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त
सभेचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. झाल्यावर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. त्यानंतर वेदमंत्रपठण करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी समितीचे श्री. सुनील कदम यांनी सांगितले.