सोन्याला उच्चांकी भाव, १० ग्रॅमची किंमत ५६ हजार ३३६ रुपये
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.०९ :- सोन्याच्या दराने सोमवारी उच्चांक गाठला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार सराफा बाजारात सोने ७४९ रुपयांनी महागले आणि ५६ हजार ३३६ रुपयांवर पोहोचले. तज्ज्ञांच्या मते यंदाच्या वर्षी सोन्याचा दर ६४ हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
याआधी २०२० च्या ऑगस्ट महिन्यात १० ग्रॅम सोन्याची किंमत ५६ हजार २०० रुपये झाली होती. चांदीच्या दरातही सोमवारी तेजी दिसून आली. सराफा बाजारात चांदी प्रतिकिलो ६९ हजार ७४ रुपयांवर पोहोचली.