ठळक बातम्या

राज्यात ४० लाख दुबार मतदार

मुंबई दि.०५ :- निवडणूक आयोगाकडून मतदारायाद्या अद्ययावत करण्याच्या राबविण्यात आलेल्या मोहिमेत राज्यात ४० लाख दुबार मतदार आढळल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४लाख ४३ हजार ५०० मतदारांची संख्या वाढली असून ५ जानेवारीपर्यंत राज्यात ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंद करण्यात आली. गेल्यावर्षी हा आकडा ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ होता, असेही देशपांडे यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेवर मोटरमन, गार्डच्या केबीनमध्ये सीसीटीव्ही बसविणार

मतदार यादीत अपंग आणि तृतीयपंथी मतदारांची संख्याही वाढली आहे. ६ लाख ६२ हजार अपंग मतदार होते, ती संख्या आता ६ लाख ७७ हजार झाली आहे. तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या ४ हजार होती ती ४ हजार ७३५ इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *