कल्याणमध्ये उद्यापासून तीन दिवसीय रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमाला
कल्याण दि.०५ :- सुभेदार वाडा कट्टा, कल्याण विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून (६ जानेवारी) तीन दिवसीय रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे यंदा तिसरे वर्ष आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प उद्या कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे गुंफणार आहेत.
देवेन भारती यांनी पदभार स्वीकारला
‘कल्याण-डोंबिवली विकासाच्या नकाशावर’ असा व्याख्यानाचा विषय आहे. ज्येष्ठ भाजप नेते जगन्नाथ पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. ७ जानेवारी रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कायदे तज्ज्ञ ॲड. उदय वारुंजीकर उपस्थित राहणार आहेत. वारुंजीकर हे ‘न्याय व्यवस्था-अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
मुंबईत ३३० नवी ई-चार्जिंग स्टेशन उभारणार
८ जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आपले विचार मांडणार आहेत. ‘रस्त्यांची विकासकामे आणि अन्न नागरी पुरवठ्याबाबत सद्यस्थित’ यावर बोलणार आहेत. ही सर्व व्याख्याने सुभेदारवाडा हायस्कूल, पहिला मजला, गांधी चौक, कल्याण पश्चिम येथे होणार असून वेळ संध्याकाळी ६.३० अशी आहे.