बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
मुंबई दि.०६ :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे खुल्या ऑनलाईन छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छायाचित्र स्पर्धेचा विषय ‘मुंबई’ असा असून स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकाला जास्तीत जास्त चार छायाचित्रे ८ x १०, ८ x १२ व १० x १२ इंच या आकारात अपलोड करावीत.
https://bit.ly/BMC_PhotoCompetition या लिंकवर अपलोड करता येणार आहेत. स्पर्धेत सहभागी घेण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२३ अशी आहे. या स्पर्धेमध्ये खुल्या गटासह महापालिका कर्मचा-यांसाठी स्वतंत्र गट आहे. या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी ६ पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत. मुंबईकरांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.