पश्चिम रेल्वेवर मोटरमन, गार्डच्या केबीनमध्ये सीसीटीव्ही बसविणार
मुंबई दि.०५ :- पश्चिम रेल्वेच्या उपनगरी लोकलमध्ये मोटरमन, गार्ड यांच्या केबिनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. येत्या जून २०२३ पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी २ कोटी ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार
या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे रेल्वे मार्गावर घडणाऱ्या दुर्घटना, अपघात, त्यामागील कारणांचा शोध घेता येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोटरमन केबिनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकल्पाला मंजुरीही दिली असून २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थंसंकल्पात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता.
मुंबईत ३३० नवी ई-चार्जिंग स्टेशन उभारणार
सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली असून पुढील महिन्यापासून मोटरमन-गार्डच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.