अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार
मुंबई दि.०५ :- अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यास तत्वतः मंजुरी दिली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे बुधवारी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईत ३३० नवी ई-चार्जिंग स्टेशन उभारणार
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगी यांनी तत्वतः मंजुरी दिली.