देवेन भारती यांनी पदभार स्वीकारला
मुंबई दि.०५ :- मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘विशेष पोलीस आयुक्त’ या पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर मोटरमन, गार्डच्या केबीनमध्ये सीसीटीव्ही बसविणार
पदभार स्वीकारण्यापूर्वी भारती यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा व सुवव्यस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. भारती हे १९९४ च्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.