विमानात बिघाड झाल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द
मुंबई दि.०५ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाणा-या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने या दोघांनी आपला औरंगाबाद, पुणे दौरा रद्द केला. हे दोघेही आज (५ डिसेंबर) औरंगाबाद आणि पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते.
देवेन भारती यांनी पदभार स्वीकारला
विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोघांनाही जवळपास अर्ध्या तासांहून अधिक वेळ विमान दुरुस्तीची वाट पाहात विमानतळावरील विशेष अतिथी कक्षात ताटकळत बसावे लागले. मात्र तरीही विमान दुरुस्त न झाल्याने आणि दुरुस्तीसाठी आणखी बराच वेळ लागणार असल्याने या दोन्ही नेत्यांनी औरंगाबाद दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम रेल्वेवर मोटरमन, गार्डच्या केबीनमध्ये सीसीटीव्ही बसविणार
बिघाड झालेलं हे विमान गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाच्या सेवेत आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात राज्य सरकारने यांची खरेदी केली होती. तेंव्हापासून हेच विमान मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दौऱ्यांसाठी वापरले जाते, असे सांगितले जाते.