मुंबईत ३३० नवी ई-चार्जिंग स्टेशन उभारणार
मुंबई दि.०५ :- ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करणारे वाहनधारक/वाहनचालक यांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईत पुढील दोन महिन्यांत ३३० नवी ई-चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. येथे सर्व प्रकारची ईलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येणार आहेत.
दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, वडाळा, वांद्रे, सायन प्रतीक्षा नगर, धारावी, महेश्वरी उद्यान, सांताक्रूझ, देवनार, शिवाजी नगर, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मरोळ, दिंडोशी, मागाठाणे, गोरेगाव, ओशिवरा, मालवणी, पोईसर, गोराई, मालाड, बॅकबे आणि आणिक अशा एकूण २६ बस आगारांत ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत
अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ईलेक्ट्रिक वाहनांसाठी पुरेशी चार्जिंग स्टेशन नसल्याने पेट्रोल-डिझेलच्या वाहन खरेदीला अजूनही पसंती देण्यात येत आहे. नागरिकांना घराच्या जवळ, आसपासच्या परिसरात चार्जिंग करणे सुलभ व्हावे यासाठी ‘बेस्ट’ ने ई चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम हाती घेतले आहे. तीन चाकी, चार चाकी, व्हॅन, बस अशा सर्व वाहनांना चार्जिंग करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. बेस्ट बसेसह ही केंद्रे सार्वजनिक वापरासाठीही खुली असणार आहेत. माफक शुल्कात वाहने चार्ज करता येणार आहेत, असे ‘बेस्ट’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.