दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.०५ :- विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे उदघाटन मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीयायेथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी उपस्थित होते. जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महापालिका जलप्रक्रिया केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे. तर मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही, हा शासनाचा निर्धार आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे केसरकर यांनी सांगितले.