ठळक बातम्या

टिळकनगर विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे स्नेहसंमेलन

दहावीचे १९६३-६४ ते २०२१-२२ तुकडीचे विद्यार्थी एकत्र येणार

डोंबिवली दि.०४ :- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे येत्या ८ जानेवारी रोजी टिळकनगर विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.‌ या स्नेहसंमेलनात टिळकनगर शाळेच्या इयत्ता दहावीच्या १९६३-६४ ते २०२१-२२ तुकडीचे विद्यार्थी एकत्र येणार आहेत. टिळकनगर विद्या मंदिर या शाळेची दहावीची पहिली तुकडी १९६३-६४ साली बाहेर पडली. त्यानंतर आजपर्यंत सुमारे ११ हजार विद्यार्थी दहावीची तर तितकेच विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडले.

महापालिका जलप्रक्रिया केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार

या स्नेहसंमेलनात आपापल्या कार्यक्षेत्रात नेत्रदीपक यश प्राप्त करणारे तीन माजी विद्यार्थी त्यांच्या यशाची गाथा उलगडून दाखवणार आहेत. व्यावसायिक गायक- गायिका असलेले माजी विद्यार्थी गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार असून काही माजी विद्यार्थी जे सेवाकार्य करतात त्याची माहिती देणार आहेत.‌ निवृत्त शिक्षकांचा सत्कार आणि त्यांचे मनोगत सादर होणार आहे.

कोणतेही वादग्रस्त विधान केले नाही, ‘स्वराज्यरक्षक’ या भूमीकेवर ठाम – अजित पवार

टिळकनगर विद्या मंदिर शाळेच्या पटांगणात संध्याकाळी ५ ते ८-३० या कालावधीत ‘आवर्तन – ३’या नावाने होणा-या या संमेलनास १९७८ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी संजय पानसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून माजी विद्यार्थी मदत करत आहेत, असे टिळकनगर शिक्षण मंडळाच्या कार्यवाह अर्चना जोशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *