‘रंग माझा वेगळा’ मध्ये रंगणार दीपा आणि कार्तिकचा लग्न सोहळा
मुंबई दि.०४ :- स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता उद्यापासून (५ जानेवारी) दीपा आणि कार्तिकचा लग्नसोहळा रंगणार आहे. आपापसातले हेवेदावे, मतभेद विसरुन ते दोघे पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत.
टिळकनगर विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे स्नेहसंमेलन
मेंदी, संगीत आणि लग्न असे सर्व काही प्रेक्षकांना उद्यापासून पाहायला मिळणार आहे. ही मालिका ३० ऑक्टोबर २०१९ मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली. रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर हे मालिकेतील मुख्य कलाकार आहेत. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित होते.