कोणतेही वादग्रस्त विधान केले नाही, ‘स्वराज्यरक्षक’ या भूमीकेवर ठाम – अजित पवार
मुंबई दि.०४ :- ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतेही वादग्रस्त विधान केले नाही. ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला शोभणारी आहे, त्यामुळे ‘स्वराज्यरक्षक’ या भूमिकेवर आजही ठाम आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी येथे केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोपही पवार यांनी केला.
केईएम रुग्णालयात त्वचा बॅंक सुरू
‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाविकास आघाडीच्या गेल्या अर्थसंकल्पात पहिल्या पानावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुणे जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे करण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. घोषणा करुन आम्ही थांबलो नाही तर, त्यासाठीची आवश्यक सर्व प्रक्रीया पूर्ण केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ‘छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार’ योजना आम्ही सुरु केली.
‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेत अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत
मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने यासंबंधी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक भारतीय जनता पक्षाला मान्य नाही का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. आजपर्यंत कोणत्याही महापुरुषाबद्दल मी वादग्रस्त विधान केलेले नाही. मात्र राज्यपालांसह भाजपचे पदाधिकारी सातत्याने महापुरुषांचा अवमान करत आहेत. मात्र त्याबद्दल ही मंडळी चकार शब्द काढत नाही, अशी टीकाही पवार यांनी केली.