महापालिका जलप्रक्रिया केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार
मुंबई दि.०४ :- मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी भांडुप आणि तुळशी तलाव येथील जलप्रक्रिया केंद्रावर देखरेखीसाठी ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महापालिका त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करणार आहे.
याठिकाणी उदंचन केंद्र, विद्युत उपकेंद्र, पूर्व प्रक्रिया केंद्र, गाळ पुनर्भिसरण यंत्रणा असे विविध विभाग आहेत. त्यामुळे जलप्रक्रिया केंद्राची सुरक्षितता अत्यंत गरजेची आहे. भांडुप जलप्रक्रिया केंद्रापासून ४.५ किमी अंतरावर तुळशी जलप्रक्रिया केंद्र आहे.
सांडपाणी थांबविण्यासाठी महापालिका सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार
याठिकाणी संदेशवहनाचे आदानप्रदान दूरध्वनी व बिनतारी संदेश वहन प्रणालीमार्फत होते. त्यामुळे या परिसरातही इलेक्ट्रॉनिक टेहळणी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि मुंबई पोलीस यांनी दिलेल्या सुरक्षा विषयक अहवालानुसार, ही यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.