‘म्हाडा’च्या मुंबई मंडळासाठी आता कायमस्वरूपी नोंदणी करता येणार
५ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू
मुंबई दि.०२ :- ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली असून येत्या ५ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे.
नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर ‘म्हाडा’च्या कोणत्याही मंडळासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. नोंदणी करणाऱ्यांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी दाखला सादर करावा लागणार आहे.