‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेत अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत
मुंबई दि.०३ :- सोनी मराठी वाहिनीवर येत्या ५ जानेवारीपासून ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ ही नवी मालिका सुरू होत असून या मालिकेत अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
सांडपाणी थांबविण्यासाठी महापालिका सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार
‘दिनकर त्र्यंबक गुळस्कर’ ही भूमिका ते मालिकेत साकारत आहेत. सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांची ही मालिका आहे. या मालिकेत समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, इशा डे, दत्तू मोरे कलाकार असून गुरुवार ते शनिवार रात्री दहा वाजता ती प्रसारित होणार आहे.