मराठी भाषा विभागाचे ‘मराठी तितुका मेळवावा’ संमेलन – ४ ते ६ जानेवारी दरम्यान आयोजन
मुंबई दि.०२ :- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे येत्या ४ ते ६ जानेवारी दरम्यान मुंबईत भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे ‘मराठी तितुका मेळवावा’ हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे होणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
‘गानसरस्वती’ पुरस्कार प्रसाद खापर्डे यांना जाहीर
लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती आणि वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण संमेलनात होणार असून मराठी पारंपारिक खेळ, पारंपारिक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल असणार आहेत. संमेलनाच्या तीन दिवसात विविध चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी माणसांचे अनुभव कथन तसेच संध्याकाळी सहा वाजता चला हसु या, महासंस्कृती आणि लोकोत्सव, मराठी बाणा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
मध्य रात्रीच्या रक्तदान शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
महाताल या वाद्य महोत्सवात पंधरा वेगवेगळ्या दुर्मिळ वाद्यांचे तसेच पुणेरी ढोल, नाशिक ढोल आणि लेझीम पथकांचे तसेच महाराष्ट्रातील भक्ती संस्कृती, आदिवासी संस्कृती, बंजारा नृत्य, शिवकालीन लोककला, कोळीगीते, बोहाडा आणि सोंगी मुखवटे यांचे सादरीकरण होणार आहे.