मध्य रात्रीच्या रक्तदान शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
ठाणे दि.०१ :- शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबीराला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी रक्तदानही केले.
रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याकडून तक्रार दाखल
आनंदाश्रम सेवा संस्थान आणि रक्तानंद संस्था यांच्या माध्यमातून गेल्या २८ वर्षांपासून ३१ डिसेंबरच्या रात्री हे रक्तदान शिबिर आयोजित करून नववर्षाचे स्वागत केले जाते.
‘गानसरस्वती’ पुरस्कार प्रसाद खापर्डे यांना जाहीर
ठाण्यातील शिवाजी मैदान येथे आयोजित या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना रक्तकर्ण पुरस्कार देखील देण्यात आला.