उर्फी जावेद हिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी- चित्रा वाघ
मुंबई दि.०१ :- मुंबईतील रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेद या अभिनेत्रीच्या विरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
शिझान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
वाघ यांनी नुकतीच बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदनही सादर केले. ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी वाघ यांनी या निवेदनात केली आहे.