रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याकडून तक्रार दाखल
मुंबई दि.०१ :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे विरोधात रविवारी अलिबागच्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. येत्या काही दिवसांमध्ये रेवदंडा पोलीस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल.
नारायण राणे आणि राज ठाकरे यांची भेट व चर्चा
त्यानंतर येत्या सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे, असे सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरुन गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले. अधिकारी किरण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी १३ वर्षांमधील बंगल्यांचा तपशील नष्ट करण्याचे आदेश दिले.
किरण पाटील हे सरकारी अधिकारी असूनही ‘मातोश्री’साठी काम करत होते. रश्मी ठाकरे यांनी १३ वर्षे या बंगल्यांसाठीची घरपट्टी भरली होती. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले, असेही सोमय्या म्हणाले. दरम्यान सोमय्या यांनी काल ठाकरे परिवाराच्या १९ बंगले घोटाळ्याचे “हिशेब सुरू” उद्या नवीन वर्ष, सकाळी ११.३० वाजता रेवदंडा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करणार, असे ट्विट केले होते.