‘गानसरस्वती’ पुरस्कार प्रसाद खापर्डे यांना जाहीर
मुंबई दि.०१ :- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२२ चा ‘गानसरस्वती’ पुरस्कार गायक प्रसाद खापर्डे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि मानपत्र असे आहे. येत्या १५ जानेवारी २०२३ रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात खापर्डे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर खापर्डे यांचे गायन होणार आहे.
सौर उर्जेवर चालणा-या हवामान केंद्राचे उदघाटन प्रदुषण, हवेची गुणवत्ता, अतिनील किरणांची माहिती मिळणार
गानसरस्वती दिवंगत किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी किशोरीताईंच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेला हा वार्षिक पुरस्कार ५० वर्षे वयाच्या आतील शास्त्रीय कंठसंगीताच्या कलाकारास दरवर्षी दिला जातो. प्रसाद खापर्डे हे रामपूर-सहस्वान घराण्याचे गायक असून सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उस्ताद राशिदखान यांचे शिष्य आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले ले आहे.