स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
कल्याण दि. ३१ :- पारनाका येथे बसविण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वामनराव साठे, काका हरदास, बाळ हरदास यांनी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सौर उर्जेवर चालणा-या हवामान केंद्राचे उदघाटन प्रदुषण, हवेची गुणवत्ता, अतिनील किरणांची माहिती मिळणार
वामनराव साठे, बाळ हरदास यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रविण देशमुख यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सुरेश पटवर्धन यांनी केले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. पारनाका परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.