राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर
१० वी ची लेखी परीक्षा २ मार्चतर १२ वी ची २१ फेब्रुवारीपासून सुरू
मुंबई दि.३१ :- राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च २०२३ तर बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहेत.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या नऊ विभागासाठी मंडळातर्फे परीक्षा घेण्यात येणार आहे.