कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेसाठीची दुसरी मेट्रो गाडी मुंबईत दाखल
मुंबई दि.३० :- ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेसाठीची दुसरी मेट्रो गाडी मुंबईत दाखल झाली. आठ डब्यांची ही गाडी आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथून मुंबईतील सारीपुत नगर येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये दाखल झाली आहे.
भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू
या डब्यांची जोडणी करून गाडीच्या चाचणीस सुरुवात करण्यात येणार आहे. मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ गाड्यांची बांधणी करण्याचे कंत्राट एमएमआरसीने श्रीसिटीतील एका कंपनीला दिले आहे. श्रीसिटीतून पहिली गाडी यापूर्वीच मुंबईत आली आहे.
मंत्रालयातील बोगस नोकरभरती प्रकरणी चौकशी केली जाईल- उपमुख्यमंत्री फडणवीस
‘मेट्रो ३’साठीच्या बीकेसी – सीप्झ या पहिल्या टप्प्यामध्ये ९ मेट्रो गाड्यांची आवश्यकता आहे. यापैकी दोन गाड्या मुंबईत दाखल झाल्या असून आता उर्वरित सात गाड्यांची प्रतीक्षा आहे.