महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची ‘घे भरारी
मुंबई दि.३० :- बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत ‘घे भरारी’ अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे नेते प्रकाश महाजन यांनी येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेसाठीची दुसरी मेट्रो गाडी मुंबईत दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ,’शिवतीर्थ’ निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली.
भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू
या बैठकीनंतर महाजन प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदार संघ असून या सर्व मतदार संघात मनसेतर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे, असेही महाजन यांनी सांगितले.