अभाविपच्या ५७ व्या कोकण प्रदेश अधिवेशनाचे उदघाटन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५७ व्या कोकण प्रदेश अधिवेशनाचे उदघाटन नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते गुरुवारी येथे झाले.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदान येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
उदघाटन सोहळ्यास अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान, प्रदेशाध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रदेश मंत्री ॲड. अमित ढोमसे, स्वागत समिती अध्यक्ष प्रा. महेश भिवंडीकर, स्वागत समिती सचिव प्रसाद कुलकर्णी, शहर अध्यक्ष प्रा. प्रीती भरणुके,शहर मंत्री कु. भूमिका देशपांडे आदी उपस्थित होते.
——