ठळक बातम्या

मंत्रालयातील बोगस नोकरभरती प्रकरणी चौकशी केली जाईल- उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. ३० 

मंत्रालयातील बोगस नोकरभरती प्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

तुझ्या गळा माझ्या गळा… शिंदे- फडणवीसांना अजितदादांचा लळा!

लिपिक पदावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून बारा बेरोजगार तरुणांना फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. चार जणांच्या टोळीने ही फसवणूक केली असून वेगवेगळी कारणे पुढे करून या बेरोजगार तरुणांकडून ७४ लाख रुपये उकळण्यात आले होते.

अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका

मंत्रालयातील बोगस नोकरभरतीप्रकरणात मंत्रालयातील आणखी किती कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे? मुलाखती दरम्यान कुणाच्या ओळखपत्राचा वापर करण्यात आला? आदी प्रश्नांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

तळे राखेल तो पाणी चाखेल – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *