तुझ्या गळा माझ्या गळा… शिंदे- फडणवीसांना अजितदादांचा लळा!
शेखर जोशी
१०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणी गेल्या वर्षभरापासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची काल ऑर्थर रोड कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली.
तळे राखेल तो पाणी चाखेल – शेखर जोशी
त्यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार हे नागपूरहून राज्य शासनाच्या खास विमानाने मुंबईत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तातडीच्या कामासाठी पवार यांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करून दिले.
अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका
शासकीय विमानाचा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर मुख्यमंत्री विमान प्रवासासाठी परवानगी देतात. मात्र ही परवानगी देताना विमानाचा वापर कोणत्या महत्त्वाच्या किंवा तातडीच्या कामासाठी होणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते.
बृहन्मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयांना कुलूप
तुरुंगातून बाहेर येणाऱ्या देशमुख यांचे स्वागत करणे हेच पवार यांचे तातडीचे काम होते हे आता स्पष्ट झाले आहे. या तातडीच्या कामासाठी पवार यांना शासकीय विमान उपलब्ध करून देणाच्या शिंदे फडणवीस यांच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘तुझ्या गळा माझ्या गळा, शिंदे- फडणवीसांना लागला अजित दादांचा लळा’ अशी चर्चा सुरू झाली आहे.
‘पठाण’ मधील ‘ते’ वादग्रस्त गाणे आणि काही भाग बदला
आणीबाणीच्या प्रसंगी राज्य शासनाचे विमान विरोधी पक्षाच्या नेत्यांना वापरायला दिले तर त्याबद्दल कोणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही. माणुसकीच्या दृष्टीतून ते योग्यच आहे.
कूपर, भगवती रुग्णालयातील घोटाळ्याची चौकशी होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मात्र ती परिस्थिती खरोखरच आणीबाणीची होती का हे पाहणे गरजेचे आहे. अनिल देशमुख यांना भेटणे हेच जर तातडीचे काम होते तर शिंदे- फडणवीस यांनी राज्य शासनाचे विमान उपलब्ध करून देण्याची काहीही गरज नव्हती.देशमुख यांच्या स्वागतासाठी अजित पवार मुंबईत गेले नसते तर काही आकाश कोसळणार नव्हते.
नववर्षाचे स्वागत आणि जल्लोषावर वाहतूक पोलिसांची नजर
राष्ट्रवादीची बाकीची मंडळी तिथे स्वागताला हजर असणारच होती. त्यामुळे पवार यांना देशमुख यांच्या स्वागतासाठी मुंबईत जाता यावे म्हणून शिंदे फडणवीस यांनी राज्य शासनाचे विमान उपलब्ध करून देण्याची ही कृती वादाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी कडोंमपा प्रयोगशाळा उभारणार
महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (आय) एकत्र असले तरी राष्ट्रवादीत अजित पवार अस्वस्थ, नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.
बँकेतील लॉकरच्या कराराचे नुतनीकरण येत्या १ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करा
राष्ट्रवादीत नाराज असलेल्या अजित पवारांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीतील काही आमदार फोडता येतात का? आणि त्यातून काही नवीन राजकीय समीकरणे जुळवता येतील का? याची चाचपणी शिंदे-फडणवीस यांनी सुरू केली असावी.
रिया चक्रवर्तीच्या भ्रमणध्वनीवर ‘एयू’ नावाने ४४ कॉल – खासदार राहुल शेवाळे
त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करून दिले असावे. देशमुख, शिवसेनेचे संजय राऊत यांची जामीनावर झालेली सुटका, इकडे आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना, अमरावती येथील कोल्हे हत्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही चौकशी करण्याची झालेली घोषणा या सर्वांचाही विचार केला पाहिजे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ‘चित्रपटाचा दुसरा भाग नव्या वर्षात- निर्माते मंगेश देसाई
अजित पवार राष्ट्रवादीचे काही आमदार फोडून शिंदे-फडणवीस यांना येऊन मिळाले तर महाविकास आघाडीला काहीच अर्थ उरणार नाही. कॉंग्रेस (आय) स्वतंत्र होईल. या सगळ्यात खरी अडचण, कोंडी शिवसेनेची होईल. किंबहुना ती करण्यासाठीच डावपेच आखले जात असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार- दिपक केसरकर
फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या त्या शपथविधीला जसा शरद पवार यांचा पाठिंबा होता तसा तो या प्रयोगालाही असू शकतो. अर्थात हे होईलच किंवा होणारच नाही, असे नाही.
भारत बायोटेकच्या नाकावाटे घेण्याच्या करोना लसीची किंमत आठशे रुपये
राजकारणात शक्य ते अशक्य आणि अशक्य ते शक्य होत असते. त्यामुळे आत्ता नाहीतर लोकसभा, विधानसभा किंवा बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी अशी काही उलथापालथ होऊ शकते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डोंबिवलीतील पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन सोहळ्याचे निमंत्रण
राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आय बरोबर शिवसेना गेली त्याचवेळी शिवसेनेच्या पतनाची बीजे रोवली गेली होती. गेल्या अडीच वर्षांत ते पाहायला मिळाले आहे. भविष्यात अजित पवार काही आमदारांना फोडून शिंदे-फडणवीस यांना येऊन मिळाले तर
शिवसेना संपविण्यासाठी शरद पवार, संजय राऊत यांनी टाकलेले जाळे बरोबर पूर्पणे विणले गेले असाच त्यातून अर्थ निघेल.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ
अजित पवार यांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करून देण्यात शिंदे- फडणवीस यांनी राजकीय सोय आणि भविष्यातील बेरजेचे गणित मांडले असले तरी त्यांची ही कृती सर्वसामान्यांसाठी वजाबाकीची आणि निषेधार्हच आहे.
—