परदेशातून आलेले दोन प्रवासी करोनाबाधित
मुंबई दि.२९ :- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी करण्यात आलेल्या करोना चाचणीत परदेशातून आलेले दोन प्रवासी करोनाबाधित आढळून आले. मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांत उपचाराधीन करोना रुग्णांमध्ये ३२ टक्क्यांनी वाढ झाली तर करोना संसर्गाची दैनंदिन संख्या दहा पेक्षा कमी आहे.
बृहन्मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयांना कुलूप
दरम्यान करोना रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून औषधांचा साठा तसेच प्राणवायू सुविधेचीही तयारी करण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी २६ वेगवेगळ्या बाबींवर काम सुरु असल्याचे बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.