दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व
मेट्रो ७ नवीन वर्षांत धावणार
मुंबई दि.२९ :- नव्या वर्षात दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व ( मेट्रो ७) सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ‘एमएमआरडीए’ चे आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी गुरुवारी गुंदावली मेट्रो स्थानकात कामाची पाहणी केली.
परदेशातून आलेले दोन प्रवासी करोनाबाधित
या मार्गावरील बहुतांश कामे पूर्ण झाली असून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो ७ सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.