बृहन्मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयांना कुलूप
मुंबई दि.२९ :- बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात असलेली सर्व राजकीय पक्षांची कार्यालयांना कुलूप लावण्यात आले आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहेल यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
‘पठाण’ मधील ‘ते’ वादग्रस्त गाणे आणि काही भाग बदला
महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर शिवसेनेचे पक्षकार वयावर आहे. हे कार्यालय ताब्यात घेण्यावरून बुधवारी महापालिकेत बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली होती.
चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे निधन
अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या लोकांना बाहेर काढावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त चहल यांनी सर्व पक्ष कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ‘उबाठाशि’ गटाने चहल यांची भेट घेऊन दैनंदिन कामासाठी कार्यालय खुले करावे, अशी मागणी केली आहे.