शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार- दिपक केसरकर
नागपूर दि.२९ :- राज्यात शिक्षक पदभरती प्रकिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.. त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी शिक्षकांच्या रिक्त पदाबाबतची समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
‘पठाण’ मधील ‘ते’ वादग्रस्त गाणे आणि काही भाग बदला
विधानसभा सदस्य रईस शेख यांनी, भिवंडी निजामपूर शहर महापालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना केसरकर बोलत होते. महापालिका हद्दीतील शाळांच्या शिक्षक संख्येबाबत नगरविकास आणि शिक्षण विभागांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही केसरकर म्हणाले.