चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे निधन
वृत्तसंस्था
मुंबई दि.२९ :- प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बोल राधा बोल, लाडला, दस, रेडी आदी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. अभिनेते मनमोहन यांचे ते सुपुत्र होते.