‘पठाण’ मधील ‘ते’ वादग्रस्त गाणे आणि काही भाग बदला
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. २९ :- पठाण’ चित्रपटातील ‘ते’ वादग्रस्त गाणे आणि चित्रपटाचा काही भाग बदलावा, अशी सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपट निर्मात्यांना केली आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ‘चित्रपटाचा दुसरा भाग नव्या वर्षात- निर्माते मंगेश देसाई
चित्रपटातील हे गाणे वादग्रस्त आणि बहुचर्चित झाले. समाज माध्यमांतूनही त्यावर टीका करण्यात आली. हिंदू धर्माभिमानी, हिंदुत्ववादी संघटनांनी या गाण्याला आक्षेप घेतला गेला. तसेच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
नववर्षाचे स्वागत आणि जल्लोषावर वाहतूक पोलिसांची नजर
हा चित्रपट नुकताच प्रमाणपत्रासाठी दाखविण्यात आला. सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचे परीक्षण करण्यात आले. परीक्षक समितीने निर्मात्यांना गाण्यासह चित्रपटात काही बदल करण्याचे सुचविले आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची सुधारित आवृत्ती सेन्सॉरकडे सादर करावी, असा आदेशही सेन्सॉर बोर्डाने दिला आहे.