मुंबई आसपास संक्षिप्त
नववर्षदिनी पहाटेपासून सिद्धिविनायकाचे दर्शन
मुंबई – नववर्षदिनी १ जानेवारीला प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाचे दर्शन पहाटे सव्वातीन वाजल्यापासून घेता येणार आहे. नववर्ष आणि रविवार असल्याने दर्शनासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या नियोजनासाठी रांगेचीही विशेष व्यवस्था करणात आली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल
मुंबई – पश्चिम रेल्वेतर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबर २०२२ आणि १ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्री चर्चगेट ते विरारपर्यंत १ जानेवारी रोजी पहाटे १.१५, पहाटे २, २.३० आणि ३.२५ वाजता चार विशेष लोकल आणि विरार ते चर्चगेट अशा चार विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत .
थंडीचा कडाका वाढणार
मुंबई – उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची दिशा किंचित बदलली असून सध्याच्या किमान तापमानात होणारी वाढ गुरुवारपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर शुक्रवारपासून तापमान कमी होण्याचा अंदाज आहे, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
साळाव- रेवदंडा पूल दुरुस्तीमूळे वाहतुकीसाठी बंद
मुंबई – रायगड जिल्हयातील मुंबईला जोडणारा महत्वाचा असलेला साळाव- रेवदंडा पूल दुरुस्तीमूळे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पुलाचे काम १९८६ मध्ये करण्यात आले होते. पुलाला बारा गाळे असून या गाळ्यांचे खांब कमकुवत झाले असल्याची माहिती स्ट्रक्टरल ऑडिटमध्ये देण्यात आली आहे.