लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर
नागपूर दि.२८ :- लोकायुक्त विधेयक आज (२८ डिसेंबर) विधानसभेत मंजूर करण्यात आले. लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात मुख्यमंत्री, अन्य मंत्री तसेच लोकप्रतिनिधीचा समावेश असणार आहे. दोन दिवसांपूर्वी हे विधेयक सदनात मांडण्यात आले होतज. आज विरोधी पक्षांच्या आमदारांच्या अनुपस्थितीत आणि कोणतीही चर्चा न होता ते संमत करण्यात आले.
अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका
१९७१ च्या लोकायुक्त कायद्याची जागा हे विधेयक घेणार असून यात भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा अंतर्भाव असणार आहे. लोकप्रतिनिधींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी कायद्याव्यतिरिक्त काही निराळ्या तरतुदींचा समावेश या विधेयकात केला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितले. लोकायुक्त कायदा संमत करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिले राज्य ठरले आहे.