श्रीलंकेबरोबरच्या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२८ :- श्रीलंकेबरोबर पुढील आठवड्यात सुरु होणा-या क्रिकेट सामन्यांसाठीचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. टी ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठीचे संघ जाहीर झाले असून टीट्वेंटीसाठी हार्दिक पंड्या तर एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मा यांच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका
रोहित शर्मा आणि विराट कोहली या ज्येष्ठ खेळाडूंना टीट्वेंटीसाठी विश्रांती देण्यात आली असून शिवम मावी आणि मुकेश कुमार या नवोदितांना संधी देण्यात आली आहे. पहिला टीट्वेंटी सामना येत्या ३ जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना पुण्यात ५ जानेवारीला तर तिसरा सामना राजकोटमधे ७ जानेवारीला होणार आहे. श्रीलंकेबरोबर एक दिवसीय ३ सामने होणार आहेत. त्यातला पहिला गुवाहाटी येथे येत्या १०, दुसरा कोलकात्यात १२ तर तिसरा तिरुवअनंतपुरम् येथे १५ जानेवारीला होणार आहे.