कर्ज घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना अटक
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२६ :– डिसेंबर कर्ज घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. चंदा कोचर यांच्या पाठोपाठ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ही मोठी कामगिरी केली आहे. कोचर आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या तेव्हा नियम धाब्यावर बसवून ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडीओकॉन समुहाला दिले गेले होते.
त्यानंतर व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचा आर्थिक फायदा करून दिल्या होता.. २०२० मध्ये सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली होती. आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉनचे भागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र पाठवून कोचर व धूत यांनी एकमेकांना कसा फायदा करून दिला हे उघड केले होते