सावरकर स्मारकाच्या तायक्वांडो उपक्रमातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रजत, कांस्यपदके पटकाविली
मुंबई दि.२५ :- दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील तायक्वांडो या क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षण उपक्रमातील विद्यार्थ्यांनीही डीएसओ जिल्हा स्तरावर महत्त्वपूर्ण सुयश मिळविले आहे.
ईशा शाह, श्रावणी तेली, जियाना शर्मा यांनी सुवर्ण पदक, अक्षरा शानभाग, अवनीश काणे यांनी रजतपदक तर हितैशी शर्मा, नायला खान आणि निआरा खान यांनी कांस्यपदक मिळविले आहे.