तळे राखेल तो पाणी चाखेल – शेखर जोशी
मराठीत ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’ अशी म्हण आहे. सध्या बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे दोघे सत्तेवर असल्यामुळे ते तळे राखताहेत आणि पाणीही चाखताहेत.
परस्परांचे वस्त्रहरण! शिल्लक सेना, नाही, क्षमस्व. – शेखर जोशी
याआधी अडीच वर्षे महाविकास आघाडी सत्तेवर असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस (आय) हे तीन पक्ष तळे राखत होते आणि पाणीही चाखत होते. सत्ताधारी आणि विरोधक सध्या एकमेकांच्या भानगडी आणि काही जुनी प्रकरणे उकरुन बाहेर काढत असले तरी यातून काहीही ठोस निष्पन्न होणार नाही किंवा कोणीही खडी फोडायला तुरुंगात जाणर नाही.
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या
सर्वपक्षीय राजकारण्यांना आपल्या आणि विरोधी पक्षातील सर्व नेत्यांच्या सर्व भानगडी, कुलंगडीसह प्रत्येकाचे हात कुठेकुठे दगडाखाली अडकलेले आहेत हे माहिती असतेच असते. फक्त त्याचा कधी, कुठे, केव्हा आणि कसा उपयोग करायचा? हे त्या त्या वेळेनुसार, राजकीय सोयीनुसार आणि परिस्थितीनुसार ठरत असते किंवा ठरविले जाते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट
प्रत्येकाची कुंडली गृहमंत्र्यांकडे तयार असते आणि म्हणूनच मंत्रिमंडळात केव्हाही गृहखाते हे सगळ्यात महत्त्वाचे मानले जाते. महाविकास आघाडी शासनाच्या काळात शिवसेनेकडे बार्गेनिंग पॉवर असूनही त्यांना गृहखाते/गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवता आले नाही किंवा शरद पवार यांनी ठेवू दिले नाही.
मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या मागणीसाठी उद्धव यांनी भाजपवाल्यांन जसे अडूवून ठेवले तसे ते महाविकास आघाडीकडेही गृहखाते, गृहमंत्रीपद शिवसेनेलाच हवे म्हणून अडून राहिले असते तर? पण उद्धव यांनी त्यांना देऊ केलेल्या मुख्यमंत्रीपदावरच समाधान मानले.
‘आयआयटी’ मुंबईच्या २५ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटींहून अधिक वेतन
गृह खाते आणि गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्वतःकडे ठेवले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असतानाही त्यावेळीही गृह खाते, गृहमंत्रपद राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्याच हातात ठेवले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ
एकदा का गृहखाते, गृहमंत्रीपद आपल्याच पक्षाच्या आणि विश्वासातील माणसाच्या ताब्यात आले किंवा दिले की आपल्या स्वतःच्याच पक्षातल्या किंवा विरोधी पक्षातल्या डोईजड होणाऱ्या एखाद्या नेत्याच्या नाड्या आवळणे सहज सोपे जाते.
आणि म्हणूनच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहखाते, गृहमंत्रपद आपल्याच पक्षाकडे ठेवले होते. असे असले तरी मुख्यमंत्री जर कणखर आणि ताठ कण्याचा असेल तर वेळप्रसंगी तो त्याच्या अधिकारात समोरच्याला अडचणीत आणणारा आदेश देऊ शकतो.
अंधेरीतील कामगार रुग्णालय प्रशासन आणि कंत्राटदार यांची चौकशी करा – राजेश शर्मा
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिखर बँक घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते हे विसरून चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात शरद पवार आणि अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा उद्देश त्यामागे होता आणि तो काही प्रमाणात यशस्वीही झाला.
वाहनांच्या पासिंगचे नियम अधिक कठोर करणार- शंभुराजे देसाई
पालघर साधू हत्याकांड, अनिल देशमुख, सचिन वाझे, कंगना राणावत, अर्णव गोसावी या प्रकरणात गृह खाते किंवा गृहमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असले तरीही मुख्यमंत्री या नात्याने माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही काही ठोस निर्णय घेता किंवा आदेश देता आले असते.
नव्या वर्षांत कल्याण ते तळोजा मेट्रो १२ च्या कमाला सुरुवात
यातून त्यांचा स्वतंत्र बाणा, मर्दपणा पाहायला मिळाला असता पण दुर्दैवाने ते कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार आणि त्यांच्या बदसल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच वागत राहिले आणि स्वतःचे तसेच शिवसेना पक्षाचेही नुकसान केले.
मुंबई ते पणजी मार्गावर उद्यापासून एसटीची शिवशाही
यात अयोग्य किंवा चुकीचे निर्णय घेणारी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांचे गृहमंत्री नामा निराळे राहिले आणि सर्व खापर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर फोडले गेले यात शिवसेनाच बदनाम झाली. असो.
महानगर गॅस कंपनी महामुंबई क्षेत्रात २९६ नवीन सीएनजी पंप उभारणार
आता गृहमंत्रीपद आणि गृह खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने अर्थातच नरेंद्र मोदी, अमिशहा यांनी जर ठरविले तर सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जे आरोप करण्यात येत आहेत त्याची सखोल चौकशी केली गेली तर अनेकांना कोंडीत पकडून तुरुंगाची हवा खायला पाठविता येऊ शकते.
ठाकरे सरकारने दिलेल्या करसवलतींची श्वेतपत्रिका काढावी- ॲड. आशिष शेलार
पण ते होणार नाही. फक्त बागुलबुवा उभा करून भीती दाखवायची. राजकारणात कधी केव्हा काय घडेल ते सांगता येत नाही. त्यामुळे २०२४ मध्ये होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकाल, स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर कोणाहीबरोबर युती/आघाडी करता यावी, तेव्हा कोणताही पर्याय खुला असावा, हुकुमाचा एक्का आपल्या हातात राहावा त्यासाठी एकमेकांचे गळे धरल्याचे चित्र निर्माण केले जाईल आणि पडद्याआड मात्र ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ प्रयोग रंगेल.
मुंबई आसपास मराठी. गूगल न्यूज़ वर लाईव्ह !!
https://news.google.com/s/CBIwqef6laIB?sceid=IN:hi&sceid=IN:hi&r=11&oc=1