ठळक बातम्या

ठाकरे सरकारने दिलेल्या करसवलतींची श्वेतपत्रिका काढावी- ॲड. आशिष शेलार

नागपूर दि.२० :- करोना काळात ठाकरे सरकारने बांधकाम व्यावसायिक, बार, पब, हाॅटेल, दारुवाल्यांना दिलेल्या कर सवलतीची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

मुंबईतील मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. त्याबाबत बृहन्मुंबई महापालिका सुधारणा विधेयक सभागृहात मांडण्यात आले. या विधेयकाला पाठिंबा देत आमदार शेलार यांनी सरकारचे अभिनंदन केले. करोना काळात ठाकरे सरकारने हाँटेल ताजला दंड माफ केला.

बांधकाम व्यावसायिकांना प्रिमियममध्ये सुमारे १० हजार कोटींची तसेच हाॅटेल, पब, बार यांना परवाना शुल्कात ५० टक्के सवलत दिली. तशीच सवलत होर्डिंग्जवाल्यांनाही दिली. विदेशी दारुवरील कर ५० टक्के माफ केला, असेही शेलार यांनी सांगितले. एकीकडे शिंदे- फडणवीस सरकारने सामान्य मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत देऊन सामान्य मुंबईकरांना दिलासा दिला तर करोना काळात ठाकरे सरकारने धनदांडग्यांवर सवलतींंची खैरात केली, अशी टीकाही शेलार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *