१९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता
इराणचा ‘ओपन सिजन’ लघुपट सर्वोत्कृष्ट
मुंबई दि.१९ :- यंदाचा १९ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, येथे पार पडला. महोत्सवात इराणच्या ‘ओपन सिजन’ या मोहम्मद हसानी दिग्दर्शित लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द्वितीय पारितोषिक मयुर धामापुरकर दिग्दर्शित ‘मोगरा’ या मराठी लघुपटाला देण्यात आले. मोहम्मद अब्बासी दिग्दर्शित ‘रेड पेन’ या इराणी लघुपटाला ज्युरी चा विशेष पुरस्कार देण्यात आला. चित्रपट समीक्षक मीना कर्णिक, दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
हेही वाचा :- मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्तांच्या कक्षेत आणणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
महोत्सवात इराण, श्रीलंका, मलेशिया, युनायटेड स्टेट्स, बांगलादेश, मराठी, बंगाली, आसामी, कोकणी, गुजराती, पंजाबी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधील आणि देशांमधून चित्रपट आणि लघुपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. त्यातून निवडक ३५ चित्रपट आणि ३० लघुपट महोत्सवात सादर करण्यात आले. महोत्सवाचा सांगता समारंभ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे’ यांच्या उपस्थितीत पार पडला.
