ठळक बातम्या

मुंबई आसपास संक्षिप्त

कल्याण जनता सहकारी बॅकेचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण

कल्याण दि.१९ :- कल्याण जनता सहकारी बॅक लि. या बॅकाने सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण केले असून त्यानिमित्ताने २३ डिसेंबर ला सकाळी ११ वाजता कल्याण येथील अत्रे रंगमंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बॅकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्य़ाला उदघाटक म्हणून केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग नितीन गडकरी, रा.स्व.संघ कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित राहणार आहेत

 

‘बदलता जम्मू-काश्मीर, नये कदम नयी तस्वीर’

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ‘बदलता जम्मू-काश्मीर, नये कदम नयी तस्वीर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, आमदार कालिदास कोलंबकर, आमदार तमील सेल्वम आदी उपस्थित होते.

 

जी-२० प्रतिनिधींची कान्हेरी लेण्यांना भेट

मुंबई :- जी २० परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-२० प्रतिनिधींनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बोरीवलीनजीकच्या साष्टी बेटाच्या अरण्यात स्थित असलेल्या प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देवून या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला. कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून सर्वजण भारावले. केंद्रीय पुरातत्व विभागाने या भेटीचे आयोजन केले होते.

 

कडोंमपाची डोंबिवली पनवेल बससेवा पुन्हा सुरू

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची करोनाकाळापासून बंद असलेली डोंबिवली-पनवेल बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. कडोंमपा डोंबिवली विभागीय कार्यालय, इंदिरा चौक, डोंबिवली पूर्व येथील बस थांब्यावरून पनवेलला जाणा-या बस सुटणार आहेत. पहिली बस सकाळी सात वाजता तर शेवटची बस रात्री ८.५० वाजता सुटणार आहे. डोंबिवली ते पनवेल या अंतरासाठी ४५ रुपये इतके भाडे आहे. पनवेल बसस्थानकमार्गे ही बस पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *