‘आयएनएस ‘मोरमुगाव’ युद्धनौकेचे १८ डिसेंबरला लोकार्पण
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.१५ :- देशाच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी आता आणखी एक भारतीय बनावटीची ‘आयएनएस ‘मोरमुगाव’ ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. गोवा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून येत्या १८ डिसेंबर रोजी युद्धनौकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
माझगाव येथील डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे जून २०१५ मध्ये ही युद्धनौका बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. सप्टेंबर २०१६ रोजी युद्धनौका बांधणीचे काम पूर्ण झाले आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली.
आयएनएस मोरमुगावमध्ये ‘ब्रह्मोस’ आणि ‘बराक’ ही भारताची सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत. ही युद्धनौका सुमारे सात हजार ४०० टनाची असून १६३ मीटर लांब आणि १७ मीटर रुंद आहे. या युद्धनौकेवर ५० अधिकारी आणि २५० कर्मचारी असे एकूण ३०० जण राहू शकतात.