वंदना चित्रपटगृहाजवळील उड्डाणपूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद
ठाणे दि.१५ :- वंदना चित्रपटगृहाजवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या पायथ्याशी काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे उद्या शुक्रवारपासून (१६ डिसेंबर) हा उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या मार्गावरून ठाण्यातील खोपट, घोडबंदर, गोकुळनगर भागातून नौपाडा, ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने सतत वाहनांची वाहतूक सुरु असते.
तसेच रात्रीही नौपाडा, ठाणे स्थानक येथून वाहने याच मार्गावरून खोपटच्या दिशेने जातात. या पुलाखालील रस्ता अरुंद असल्याने या मार्गाला जोडणाऱ्या खोपट, मखमली तलाव, वंदना सिनेमा, तीन पेट्रोल पंप आणि हरिनिवास चौक या भागातही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.