प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता स्टीफन बॉसची आत्महत्या
वृत्तसंस्था
लॉसएंजलिस दि.१५ :- प्रसिद्ध अभिनेता, नृत्य कलाकार आणि डीजे स्टीफन बॉस यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. लॉसएंजलिसमधील एका हॉटेलच्या खोलीत पोलिसांना स्टिफन यांचा मृतदेह सापडला. स्टीफन बॉस ‘द इलेन डी जोन्स’ आणि ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ सारख्या शोसाठी ओळखले जात होते. याशिवाय ते त्याच्या उत्कृष्ट नृत्यासाठीही प्रसिद्ध होते.
स्टिफन हे त्यांची गाडी न घेता घरातून बाहेर पडले. याआधी ते गाडी न घेता कधीच घराबाहेर पडले नव्हते, अशी माहिती स्टीफन बॉसची पत्नी एलिसन हॉकर यांनी दिली. स्टिफन यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास सुरू आहे.